
Free चालू घडामोडी सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 26 Octomber 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 26 Octomber 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsINS विक्रांत जहाजाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या 1. त्याची बांधणी कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ही कंपनी भारतीय नौसेनेसाठी करीत आहे. 2. ती देशातच बांधण्यात आलेली पहिली विमानवाहू युद्धनौका आहे.दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
Correct
Incorrect
दोनही विधाने अचूक आहेत, त्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे. INS विक्रांत ही देशातच बांधण्यात आलेली पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. INS विक्रांत या भारताच्या प्रथम स्वदेशी विमानवाहू जहाजाचे बांधकाम केरळच्या कोची येथे कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी करीत आहे
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या देशाने 24 ऑक्टोबर 2021 रोजी शिजियान-21 नामक नवीन उपग्रह यशस्वीरीत्या अंतराळात प्रक्षेपित केला?Correct
Incorrect
चीन देशाच्या चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन (CASC) या अंतराळ कंपनीने 24 ऑक्टोबर 2021 रोजी शिजियान-21 नामक नवीन उपग्रह यशस्वीरीत्या अंतराळात प्रक्षेपित केला. अंतराळातील कचरा नष्ट करण्याच्या तंत्रज्ञानाची चाचपडताळणी करण्यासाठी या उपग्रहाचा वापर केला जाईल
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ दिवस साजरा करतात?Correct
Incorrect
दरवर्षी 24 ऑक्टोबर या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ दिवस साजरा करतात. 2021 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाचे 76 वे वर्धापन वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या देशाने दहाव्या जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह निमित्त जागतिक कार्यक्रमाचे आयोजन केले?Correct
Incorrect
दरवर्षी 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जगभरात जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह पाळण्यात येतो. 2021 साली सार्वजनिक हितासाठी माध्यम आणि माहिती साक्षरता या संकल्पनेखाली, दक्षिण आफ्रिका या देशाने दहाव्या जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह निमित्त जागतिक कार्यक्रमाचे आयोजन केले
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या संस्थेने बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFCs) सुधारित स्तरनिहाय नियमन (SBR) कार्यचौकट निश्चित केली?Correct
Incorrect
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFCs) सुधारित स्तरनिहाय नियमन (SBR) कार्यचौकट निश्चित केली आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे 01 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. स्तरनिहाय नियमनासाठी NBFC कंपन्यांना त्यांच्या आकार, क्रियाकलाप आणि जोखम या घटकांच्या आधारावर पुढीलप्रमाणे चार स्तरांमध्ये विभागले - NBFC-बेस लेयर (NBFC-BL), NBFC-मिडल लेयर (NBFC-ML), NBFC-अप्पर लेयर (NBFC-UL) आणि NBFC-टॉप लेयर (NBFC-TL)
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsगुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात 'बन्नी' नावाच्या म्हैस-जातीच्या भारतातील पहिल्या IVF रेडकूचा जन्म झाला?Correct
Incorrect
बन्नी' नावाच्या म्हैस-जातीच्या भारतातील पहिल्या IVF (इन-व्हिट्रो फर्टीलायझर) रेडकूचा जन्म गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातील धनेज येथे झाला. ते IVF (इन-व्हिट्रो फर्टीलायझर) तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्मलेले भारतातील सर्वात पहिले रेडकू ठरले आहे
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी दिवस साजरा करतात?Correct
Incorrect
दरवर्षी 24 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी दिवस साजरा करतात. प्राचीन काळापासून जगाला आकार देण्यामध्ये मुत्सद्द्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करणे हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणती व्यक्ती "द ऑरिजिन स्टोरी ऑफ इंडियाज स्टेट्स" हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?Correct
Incorrect
वेंकटराघवन सुभा श्रीनिवासन हे "द ऑरिजिन स्टोरी ऑफ इंडियाज स्टेट्स" हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या संस्थेने गरुड अॅप तयार केले?Correct
Incorrect
देशातील सर्व मतदान केंद्रांच्या डिजिटल मानचित्रणासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) गरुड नामक एक मोबाइल अॅप तयार केले. अॅपद्वारे, केंद्रावरील नियुक्त अधिकारी (BLO) त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून केंद्राचे अक्षांश आणि रेखांश यांसारख्या माहितीसह मतदान केंद्रांचे छायाचित्र आणि ठिकाण यांची माहिती अपलोड करतील
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक विकास माहिती दिवस साजरा करतात?Correct
Incorrect
दरवर्षी 24 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विकास माहिती दिवस साजरा करतात. विकासाच्या समस्यांकडे जागतिक जनमताचे लक्ष वेधून घेणे आणि सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी त्यांचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे हा या दिवसाचा उद्देश आहे