Modern technology gives us many things.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल 9 हजार 785 पदे रिक्त!! | PCMC Recruitment 2023

PCMC Recruitment 2023

334

PCMC Recruitment 2023

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील तब्बल 9 हजार 785 पदे रिक्त आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर महापालिकेचा गाडा हाकला जात आहे. रिक्त पदांचा अहवाल पुढील आठवड्यात शासनाला सादर करण्यात येणार आहे. तर आस्थापना खर्चाच्या मर्यादेमुळे महापालिका सद्यस्थितीत जास्तीत जास्त 1 हजार 578 इतकेच मनुष्यबळ भरती करू शकते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला असून यामध्ये 16 हजार पदांचा समावेश आहे. यात काही जुनी पदे वगळून काही नवीन पदे निर्माण केली आहेत. तसेच दर महिन्यास किमान 15 ते 20 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर आणि स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिकेत रिक्त पदांचा अनुषेश वाढत असून सध्या 9 हजार 785 पदे रिक्त आहेत. दुसरीकडे महापालिका हद्दीतील लोकवस्ती वेगाने वाढत असल्याने लोकसंख्या वाढून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत.

 

 

उत्पन्नाच्या 35 टक्‍केच खर्चाची मर्यादा

पिंपरी महापालिकेचे विविध विभागातील अ, ब, क आणि ड या चार वर्गवारीनुसार 16 हजार 838 पदे मंजूर आहेत. यामध्ये सध्यस्थितीत 7 हजार 53 पदे भरलेली आहेत. तर 9 हजार 785 पदे रिक्त आहेत. मात्र, महापालिकेच्या उत्पन्नाच्या आस्थापना खर्च हा जास्तीत-जास्त 35 टक्‍यांपेक्षा जास्त असू नये, असे बंधन आहे. सध्याचा आस्थापना खर्च हा 35 टक्के आहे. त्यामुळे रिक्त पदांची आकडेवारी जरी मोठी असली तर पुढील काळात फक्त महापालिका यापूर्वी जाहिरात दिलेली 498 आणि नव्याने 1 हजार 80 पदांचीच जाहिरात देऊ शकते. त्यामुळे उर्वरित रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचारी नेमण्याशिवाय महापालिका प्रशासनाला पर्याय नाही.

 

भरती परीक्षेला विलंब

महापालिकेच्या गट ब आणि क या सवंर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने अर्जही मागविले आहेत. या 386 पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार आले आहेत. यामधील सुमारे 90 हजार जणांनी परीक्षेचे शुल्क भरले आहे. या सर्व पदांची परीक्षा घेण्यास टीसीएस कंपनीला नियुक्त केले आहे. मात्र, मोठ्या संख्येत अर्ज आल्याने परीक्षेचे नियोजन कधी करावे, असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे विलंब होत आहे.

 

15 मे पूर्वी पदांची भरती करा

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महापालिका आणि नगरपरिषदांमधील रिक्त पदे भरण्याची घोषणा केली. त्यानुसार पिंपरी पालिकेकडे रिक्त पदांची आकडेवारी मागितली आहे. तसेच रिक्त असलेली पदांसाठी जाहिरात देऊन 15 मे पूर्वी रिक्त पदे भरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

महापालिकेचा 16 हजार पदांचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. मात्र, आस्थापना खर्च हा महापालिकेच्या उत्पन्नाच्या 35 टक्‍यांपेक्षा जास्त असू नये, असे बंधन आहे. सध्याचा अस्थापना खर्च हा 35 टक्के आहे. त्यामुळे रिक्त पदांची आकडेवारी जरी जास्त असली तरी पालिका जास्तीत-जास्त 1 हजार 578 पदेच भरू शकते.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पिंपरी-चिंचवड महापालिका,

PCMC Recruitment 2023

 

Leave A Reply

Your email address will not be published.