
Maharashtra SSC Result 2022
SSC Board Result : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची वाट पाहत आहे. महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE)बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
- महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार?
- याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.
- दरम्यान दहवीच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे स्कोअरकार्ड पाहू शकतील.
- महाराष्ट्र बोर्डाने यापूर्वीच बारावीचा निकाल जाहीर केला आहे.
- दहावीची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षणमंत्र्यांच्या पुष्टीनंतर पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्याने दिली होती.
- निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
- दहावीचा निकाल १५ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- दरम्यान विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी मंडळाची वेबसाइट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच यासंदर्भात घोषणा करतील.
१६ लाख विद्यार्थ्यांचा निकाल
महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च २०२२ मध्ये झाली. काही दिवसांपूर्वीच बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,