Modern technology gives us many things.

पोलिस शिपाई भरती नियमात बदल : शासनाची अधिसूचना!- Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022

16

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 : राज्य सरकार पोलिस भरती करणार असून त्यासाठी भरती नियमात बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आधी शारीरिक परीक्षा होणार असून यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

पूर्वी १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येत होती. त्यानंतर शारीरिक चाचणी होत होती. परंतु, आता शासनाने यात थोडा बदल केला आहे. नव्या नियमानुसार आधी ५० गुणांची शारीरिक चाचणी होईल. या शारीरिक चाचणीत पात्र ठरणाऱ्यांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. लेखी परीक्षा ही १०० गुणांची असेल. यासाठी ९० मिनिटांचा वेळ मिळेल. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळणारे उमेदवारच पात्र ठरणार आहेत.

शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदाच्या १ः१० प्रमाणात लेखी चाचणीसाठी बोलावण्यात येईल. उदा. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये १० रिक्त पदे व अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये ५ रिक्त पदे असतील तर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार १०० (१०*१०= १००) उमेदवार सुचीबद्ध करण्यात येतील. अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार ५० (१०*५=५०) उमेदवार सूचीबद्ध करण्यात येतील. अनुसूचित जातीच्या १०० व्या क्रमांकावर व अनुसूचित जमातीच्या ५० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या उमेदवारास असतील तेवढे सर्व जण लेखी चाचणीस पात्र असतील.

लेखी परीक्षेतील विषय

  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • अंकगणित
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

शारिरिक चाचणी

पुरुष उमेदवार

  • १६०० मीटर धावणे २० गुण
  • १०० मीटर धावणे १५ गुण
  • गोळाफेक १५ गुणे

महिला उमेदवार

  • ८०० मीटर धावणे २० गुण
  • १०० मीटर धावणे १५ गुण
  • गोळाफेक १५ गुणे

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

पोलीस भरती GR ( अधिसूचना )
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.