
जाणून घ्या या महानगरपालिकेत आरोग्यधिकारी पदे रिक्त
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022 : महापालिकेतील आरोग्यधिकारी पद गेली अनेक वर्षे प्रभारीवरच अवलंबून आहे. तब्बल १० वर्षे झाली महापालिकेला कायमस्वरूपी आरोग्यधिकारी मिळालेले नाहीत. कोल्हापुरात सध्या डेंग्यू, चिकुनगुनियासह साथीचे आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहेत. परंतु, महापालिकेकडे कायमस्वरूपी आरोग्यधिकारी नाहीत. ठोक मानधनावर किंवा महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवून महापालिका प्रशासन वेळ मारून नेत आहे. राज्य शासनाने लवकरात लवकरमहापालिकेत आरोग्यधिकारीपदावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव यांच्याकडे पुन्हा प्रभारी पद सोपविण्यात आले आहे: मात्र कौटंबिक कारणास्तव गेले काही वर्षे ते स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करत आहेत. निवृत्तीसाठी ३० वर्षांची अट असल्याने आणि डॉ. जाधव यांनी अर्ज केला असल्याने प्रशासनासमोर त्यांना सेवानिवृत्ती देण्याशिवाय पर्याय नाही. इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रभारी आरोग्यधिकारी पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे आता हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022,
कोल्हापुर महानगरपालिका भरती,
आरोग्यधिकारी भरती