Free चालू घडामोडी सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 25-august 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 25-august 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या संस्थेने निओबोल्ट नामक भारताचे पहिले स्वदेशी मोटर-चलित व्हीलचेअर वाहन विकसित केले?Correct
Incorrect
मद्रास येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने निओबोल्ट नामक भारताचे पहिले स्वदेशी मोटर-चलित व्हीलचेअर वाहन विकसित केले आहे. दिव्यांग लोकांसाठी तयार केलेले हे व्हीलचेअर वाहन केवळ रस्त्यांवरच नव्हे तर असमान भूभागावर देखील वापरले जाऊ शकते. त्याचा कमाल वेग ताशी 25 किमी एवढा आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC इंडिया) या संस्थेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली?Correct
Incorrect
नकुल चोप्रा यांची ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC इंडिया) या संस्थेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC इंडिया) ही प्रसारण उद्योग, जाहिरात उद्योग आणि जाहिरात व प्रसार माध्यम संस्थांची प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संघटना आहे. ती जगातील सर्वात मोठी दूरदर्शन-मापनशास्त्र उद्योग-संस्था आहे. त्याची स्थापना 2010 साली झाली आणि त्याचे मुख्यालय मुंबई शहरात आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या कालावधीत जागतिक जल आठवडा 2021 पाळण्यात आला?Correct
Incorrect
दरवर्षी 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या कालावधीत जागतिक जल आठवडा पाळतात. 1991 सालापासून,जागतिक जल आठवडा हा स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट (SIWI) या संस्थेच्या नेतृत्वात आयोजित केला जाणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे, ज्यादरम्यान जागतिक जलसमस्या आणि आंतरराष्ट्रीय विकासाशी संबंधित चिंतेबद्दल जागृती निर्माण केले जाते. 2021 साली जागतिक जल आठवडा हा 'बिल्डिंग रेझिलियन्स फास्टर' या संकल्पनेखाली पाळण्यात आला.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या संस्थेसोबत भारताने बंगळुरू शहरातील मेट्रो रेल्वे जाळे विस्तारित करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा कर्ज करार केला?Correct
Incorrect
बंगळुरू शहरातील मेट्रो रेल्वे जाळे विस्तारित करण्यासाठी 23 ऑगस्ट 2021 रोजी भारत सरकार आणि आशियाई विकास बँक (ADB) यांच्यात 500 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा कर्ज करार झाला.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची मणिपूर राज्याच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झालीCorrect
Incorrect
भारतीय संविधानातील कलम 153 ते कलम 162 अन्वये प्राप्त अधिकारांच्या वापर करीत राष्ट्रपति राम नाथ कोविन्द यांनी भाजप नेता ला गणेशन यांची मणिपूर राज्याच्या राज्यपाल पदावर नियुक्ती केली असून त्यांनी 23 ऑगस्ट 2021 पासून पदभार सांभाळला आहे. 10 ऑगस्ट 2021 रोजी नजमा हेपतुल्ला निवृत्त झाल्यापासून पद रिक्त होते.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने 6 लक्ष कोटी रुपयांची योजना असलेली राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा (नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन) याची घोषणा केली?Correct
Incorrect
23 ऑगस्ट 2021 रोजी भारताच्या वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा (नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन) याच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. योजनेत केंद्रीय सरकारच्या ब्राउनफिल्ड पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठीची आर्थिक वर्ष 2022 ते 2025 या चार वर्षांची रुपरेषा समाविष्ट आहे. गुंतवणूकदारांसाठी दृश्यमानता प्रदान करण्याव्यतिरिक्त ते सरकारच्या मालमत्ता चलनीकरण उपक्रमासाठी मध्यम मुदतीची रुपरेषा म्हणून देखील कार्य करेल. याच्यानुसार केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या मालमत्तांचे मुद्रीकरण केले जाईल. नियोजित चार वर्षाच्या कालावधीत केंद्रीय सरकारच्या मिळकतीच्या मुद्रीकरणातून 6 लक्ष कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी होऊ शकेल. मुद्रीकरणातून निर्मिती या तत्वावर आधारित मालमत्ता मुद्रीकरणाचे उद्दिष्ट, नवीन पायाभूत सुविधा निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आमंत्रित करणे हे आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या शहरात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भारतातील पहिला स्मोग टॉवर उभारण्यात आलाCorrect
Incorrect
दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भारतातील पहिला स्मोग टॉवर उभारण्यात आला आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्स (APHC) किंवा तेहरीक-ए-हुरियत याच्या संदर्भात अचूक विधान ओळखाCorrect
Incorrect
फक्त विधान A अचूक आहे. ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्स (APHC) किंवा तेहरीक-ए-हुरियत ही 26 राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांची एक युती आहे. भारतीय क्षेत्रात सक्रिय असलेली ही युती वेगळ्या काश्मिरची मागणी करते आणि त्यासाठी अनेक बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये गुंतलेली आहे. त्याची स्थापना 9 मार्च 1993 रोजी झाली.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsINS शक्ती हे कोणत्या श्रेणीचे जहाज आहे?Correct
Incorrect
भारतीय नौदलाकडील INS शक्ती हे दिपक श्रेणीचे मालवाहू जहाज आहे. सध्या सुरु असलेल्या मिशन सागरचा एक भाग म्हणून, हे जहाज हिंद महासागर क्षेत्रातील इतर मित्र देशांना वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी कार्यरत आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsयुक्तधारा नामक संकेतस्थळाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या 1. ते MGNREGA मालमत्तांचे भूस्थानिक नियोजन सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. 2. ते ISRO आणि पंचायतराज मंत्रालय यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
फक्त विधान 1 अचूक असल्यामुळे पर्याय (A) उत्तर आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री, श्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते 'भुवन' अंतर्गत "युक्तधारा"-जियोस्पेशियल प्लॅनिंग पोर्टल या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन झाले, जे रिमोट सेन्सिंग आणि GIS आधारित माहिती वापरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) योजनेच्या अंतर्गत निर्माण केलेल्या नवीन मालमत्तांचे नियोजन सुलभ करेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांनी संयुक्तपणे हा मंच तयार केला आहे. ISRO संस्थेचे हैदराबाद येथील NRSC केंद्र वापरकर्त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागाचे 2D/3D स्वरूपात नकाशा उपलब्ध करून देते, जे भुवन नावाच्या सॉफ्टवेअर व्यासपीठावरून उपलब्ध होते.