Free चालू घडामोडी सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 15-august 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 15-august 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या देशाने 12 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या IBSA देशांच्या पर्यटन मंत्र्यांच्या आभासी बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?Correct
Incorrect
भारत देशाने 12 ऑगस्ट 2021 रोजी IBSA (भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका) देशांच्या पर्यटन मंत्र्यांची आभासी बैठक आयोजित केली. IBSA ही त्रि-सदस्यीय, विकासात्मक संघटना असून भारत, ब्राझील आणिदक्षिण आफ्रिका यांच्यात विविध विषयांवर सहकार्य आणि परस्पर आदानप्रदानाला या संघटनेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. सर्व सदस्य देशांच्या आर्थिक विकासासाठी तसेच पर्यटनाला चालाना देण्यासाठी परस्पर संबंध अधिक दृढ करणे, हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या देशाने 12 ऑगस्ट 2021 रोजी अणुशक्ति-सक्षम गझनवी क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतली?Correct
Incorrect
पाकिस्तान देशाने 12 ऑगस्ट 2021 रोजी अणुशक्ति-सक्षम गझनवी क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी पार पाडली. गझनवी हे 290 किमीपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकणारे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या श्रेणीमध्ये 2018 या वर्षासाठीचे प्रधानमंत्री श्रम पुरस्कारांचे वाटप करण्यात आले?Correct
Incorrect
भारत सरकारने 2018 या वर्षासाठीच्या प्रधानमंत्री श्रम पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री श्रम पुरस्कार केंद्रीय आणि राज्य सरकारांच्या विभागीय उपक्रमातील आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील तसेच पाचशे किंवा त्याहून जास्त कर्मचारी असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील विभागांमधील एकूण 69 कामगारांना जाहीर करण्यात आले आहेत. 2018 या वर्षासाठी पुरस्कार प्राप्त कामगारांची एकूण संख्या 69 असून या वर्षी एकूण 33 श्रम पुरस्कार देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री श्रम पुरस्कार कामगारांची विशेष कामगिरी, अनोखी कार्यक्षमता, उत्पादनाच्या क्षेत्रात लक्षणीय सहभाग त्याशिवाय असाधारण धैर्य आणि प्रसंगावधान या बाबीं विचारात घेऊन देण्यात येतात. पुरस्कार कर्तव्य बजावताना आलेल्या मृत्यूसाठीही मरणोत्तर दिला जातो. प्रधानमंत्री श्रम पुरस्कार तीन श्रेणीत देण्यात येतात - श्रमभूषण पुरस्कार हे प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक आहे. श्रमवीर किंवा श्रम वीरांगना पुरस्कार हे प्रत्येकी 60 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आहे. श्रमश्री / श्रमदेवी पुरस्कार हे प्रत्येकी 40 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या देशात निंग्बो-झौशन बंदर वसलेले आहे?Correct
Incorrect
निंग्बो-झौशन बंदर चीन देशात वसलेले एक ठिकाण आहे. ते जगातील सर्वात व्यस्त बंदर आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 points______ याच्या अंतर्गत देशभरातील अपंग लोकांची एक चमू कुमार पोस्ट (सियाचीन ग्लेशियर) पर्यंत पोहचण्याची मोहीम हाती घेतील.Correct
Incorrect
देशभरातील अपंग लोकांची एक चमू सियाचिन ग्लेशियरपर्यंत पोहचण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन ब्लू फ्रीडम' असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेच्या पुर्नत्वासह, अपंग लोकांच्या सर्वात मोठ्या पथकाद्वारे जगातील सर्वोच्च युद्धभूमीवर पोहोचण्याचा नवीन विश्वविक्रम रचला जाईल.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने शहरी बचत गटांनी (SHG) तयार केलेल्या उत्पादनांच्या विपणनासाठी 'सोनचिरैया' या नावाने एक ब्रँड आणि बोधचिन्ह सादर केला?Correct
Incorrect
शहरी बचत गटांनी (SHG) तयार केलेल्या उत्पादनांच्या विपणनासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालयाने 'सोनचिरैया' (SonChiraiya) किंवा सोनचिडिया या नावाने एक ब्रँड आणि बोधचिन्ह सादर केला आहे
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या देशात 2021 साली आग्नेय आशिया सहकार्य आणि प्रशिक्षण (SEACAT) आयोजित करण्यात आले?Correct
Incorrect
सिंगापूरमध्ये संयुक्त राज्ये अमेरिकेच्या नौदलाच्या नेतृत्वाखाली 2021 सालाचा आग्नेय आशिया सहकार्य आणि प्रशिक्षण (SEACAT) नामक बहूदेशीय लष्करी कवायत आयोजित करण्यात आली.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या देशाच्या अध्यक्षखाली 12 ऑगस्ट 2021 रोजी SCO देशांच्या कृषी मंत्र्यांची 6 वी बैठक पार पडली?Correct
Incorrect
12 ऑगस्ट 2021 रोजी दुशान्बे (ताजिकिस्तान) येथून ताजिकिस्तान देशाच्या अध्यक्षखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सदस्य देशांच्या कृषी मंत्र्यांची 6 वी बैठक पार पडली
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या दिवशी भारतात विभाजन भयावह स्मृति दिवस पाळला जाणार आहे?Correct
Incorrect
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे की 14 ऑगस्ट हा दिवस भारतात विभाजन भयावह स्मृति दिवस म्हणून पाळला जाणार आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsसफरचंदाचे कोणते वाण APEDA संस्थेच्यामार्फत बहरीन देशाकडे निर्यात करण्यात आले?Correct
Incorrect
हिमाचल प्रदेश हॉर्टिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग अँड प्रोसेसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (HPMC) यांच्या सहकार्याने सफरचंदाचे पाच वाण प्रथमच बहरीन देशाकडे निर्यात करण्यात आले आहे. त्यात रॉयल डिलीशियस, रेड वेलॉक्स, डार्क बॅरन गाला, स्कार्लेट स्पर आणि गोल्डन डिलीशियस या जातींचा समावेश आहे